कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक दिनी काळी फीत लावून आंदोलन

अमळनेर :येथील प्रताप महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांबाबत लिखित आश्वासनांची अंमलबजावणी न करणे व इतर अनेक समस्या संदर्भात चर्चा करत नसल्याने दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी शिक्षकांनी काळी फीत लावून शासनाचा निषेध करणारे आंदोलन शैक्षणिक कामकाज नियमित सुरू करून केले. त्याबाबत निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन सर यांना दिले तसेच या आंदोलनाबाबत निवेदन शिक्षक महासंघाने मा.शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांना पाठवलेले आहे. या आंदोलन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उल्हास जी.मोरे सर,पर्यवेक्षक प्रा.आर. एम.पारधी सर,प्रा.ए.के.अग्रवाल, प्रा.डी.व्ही.भलकार सर,प्रा. सी.बी. सूर्यवंशी,संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे सचिव प्रा.स्वप्निल पवार,

जिल्हार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील,प्रा.किरण पाटील,प्रा. आर.एस.महाजन,प्रा. सी.आर.पाटील,प्रा.बी.गुलाले, प्रा.जितेश संदानशिव,प्रा.शालिनी पवार मॅडम,प्रा.बापू संदानशिव,प्रा.व्ही.एस. पाटील,प्रा. जी.एल.धनगर प्रा.लांडगे मॅडम,प्रा.विलास पाटील,प्रा.योगेश वाणी प्रा.पी.एल.ठाकूर, प्रा.पी.म.तायडे,प्रा.एम.एस.पाटील मॅडम व इतर संघटना सदस्य उपस्थित होते.

[democracy id="1"]