जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

अमळनेर: येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी माजी राष्ट्रपती स्व.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,संचालक नीरज अग्रवाल,योगेश मुंदडे,मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,सी.एस.सोनजे,एस.आर.शिंगाने तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. सकाळ व दुपार विभागात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापन केले.

[democracy id="1"]