आज अमळनेर तालुक्यात काँग्रेसची जनसंवाद यात्रा

जनसंवाद यात्रा
जनसंवाद यात्रा

अमळनेर: भाजप शासनाच्या काळातील भारताची परिस्थिती अगदी असामाधानकारक आहे. त्या परिस्थितीत योग्य प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी मा. श्री राहुलजी गांधीनी भारत जोडो यात्रा काढली. तरी देखील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाही. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळे नाही. कारण ई.डी, इन्कम टॅक्स अशी हत्यारे वापरून विरोधकांना रट्टा लावणे, खोटे गुन्हे दाखल करणे सुरूच आहे. शासकीय यंत्रणाचा धाक दाखवून भाजप राजकारण्यांचा तोंड दाबून बुक्कीचा मार देत आहे. सर्वच शासकीय कंपन्या धन दांडग्यांना विकल्या जात आहेत, अजून हि विक्री चालूच आहे. २०१४ साली भारत देशावर ५६ लाख कोटींचे कर्ज होते. आज ते १०१ कोटींनी वाढले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. विकासाकडे,विकासकामांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. असे अनेक मुद्दे हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. जनसंवाद यात्रेत बाबासाहेब कुणालाजी पाटील ,माजी खासदार उल्हास दादा पाटील, यावलचे आमदार शिरीष चौधरी ,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीपची पवार, माजी अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, नानासाहेब डी.डी पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे व त्यांच्या समवेत जिल्ह्यातील बरेचशे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही जनसंवाद यात्रा उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी रविवारी दुपारी ३ वाजता अमळनेर तालुक्यात येत आहे.
सावखेडा -मुंगसे-रूंधाटी- मटगव्हाण-,पातोंडा-नंद्री-खवशी-खेडी -अमळगाव- गांधली अमळनेर असा जनसंवाद यात्रेचा मार्ग असून दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धार-मालपुर-मारवड-कळमसरे-,निम-परत अमळनेर पुढे कु-हे टाकरखेडा-म्हसले-धरणगाव कडे प्रयान होणार आहे.
तरी या जनसंवाद यात्रेत तालुक्यातील सर्व ज्येष्ठ ,श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे अमळनेर तालुका शहर काँग्रेस काॅग्रेस तर्फे कळविले आहे.अशी माहिती काॅग्रेस चे अमळनेर तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली आहे.

[democracy id="1"]