अमळनेरला 3 सप्टेंबर रोजी आमदार रोहित पवारांचा दौरा

शेतकरी,कष्टकरी विद्यार्थी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

अमळनेरला 3 सप्टेंबर रोजी आमदार रोहित पवार व रोहित.आर.पाटील यांचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पत्रकार
परिषदेत माहिती.

अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व आमदार रोहित पवार व रोहीत आर पाटील यांचा अमळनेरला ३ सप्टेंबरला२०२३ रोजी . शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदेश लढा विचारांचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा देण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी अनेक विषयांवर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. असे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले. तर प्रास्ताविक
शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केले.
५ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी
कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे जळगांवला सागर
पार्क येथे सभेचे आयोजन दुपारी दोन ते पाच वाजेच्या वेळेत केले आहे. अमळनेर तालुक्यातून असंख्य कार्यकर्तें जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
राष्ट्वादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी व
विविध विषयांवर शेतकरी,कष्टकरी, विद्यार्थी व राष्ट्रवादी कॉग्रेस
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी आमदार रोहित पवार व युवा नेते रोहीत आर पाटील अमळनेरला ३ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहामध्ये येऊन संवाद साधणार आहेत. त्यासाठी अमळनेर येथील जास्तीत जास्त समविचारी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी महिला व शहर वासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारीनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील, शहराध्यक्ष शाम जयवंतराव पाटील, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमाताई पाटील, ग्रंथालय प्रदेशअध्यक्ष उमेश पाटील,ग्रंथालय प्रदेश सचिव रिता बाविस्कर , हर्षाताई चित्ते, डाँ किरण पाटील,अरुण शिंदे सर, मनोहर पाटील,मधुकर आबा,सनी गायकवाड सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

[democracy id="1"]