अमळनेर :अमळनेरला विदयाविहार काँलनीत
भाविकांचे श्रध्दास्थान महादेव मंदीराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व भव्य मिरवणूकीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन दि. 26~8~2023 शनिवार रोजी दुपारी 4 वाजता भव्य मिरवणूक दि. 27~8~2023 रविवार रोजी सकाळी 9 ते 5 वाजे पर्यंत पूजा ,दि. 28~8~2023 सोमवार रोजी सकाळी महामण्डलेश्वर स्वामी हंसानन्द तीर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर निम, अमळनेर यांच्या हस्ते कळस लावणे तसेच दुपारी 12 वाजता प्राणप्रतिष्ठा आहे.तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक
विद्येश्वर महादेव मंदिर, विद्या विहार कॉलनी, अमळनेर.जि. जळगाव यांनी कळविले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पिंताबर पाटील यांनी केले आहे.