देशभक्तीपर गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविले.

मंगळग्रह सेवा संस्था व पत्रकार संघटनांचा उपक्रम

अमळनेर : स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला १४ आॅगस्ट रोजी रात्री घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गितगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षीस वितरण करुन गौरविण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर गितगायन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विविध शाळेतील चिमुल्यांनी सहभाग नोंदविला होता. मंगळग्रह मंदिरावर आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात विजयी विद्यार्थ्यांंना बक्षीस देऊन नुकतेच गौरविण्यत आले. यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस सार्थक उज्ज्वल पाटील या विद्यार्थ्यास देण्यात आले असून त्यास रोख ११०० रुपये, मंगळग्रह देवतेची प्रतिमा तसेच श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय तेजस्वी योगेश भामरे (७०० रुपये) तर तृतिय जयेश संदिप बागुल (५०० रुपये) या विद्यार्थ्यांनाही रोख रक्कम, मंगळग्रह देवतेची प्रतिमा व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच जान्हवी हेमंतकुमार बागुल, निष्का अरविंद संदानशिव, स्वरा राहुल पाटील आणि वैष्णवी नरेंद्र सोनार या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख १०० रुपये, मंगळग्रह देवतेची प्रतिमा व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच परिक्षक म्हणून लाभलेले नयना कुलकर्णी व प्राजक्ता पाटील यांचाही सत्कार मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आला.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस रवींद्र मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय गाढे, तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, तालुका कार्याध्यक्ष समाधान मैराळे, उपाध्यक्ष धनंजय सोनार, सचिव सुरेश कांबळे, सह प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे, सदस्य सुकदेव ठाकुर, दिनेश नाईक, नुरखान पठाण, विकी जाधव, आत्माराम अहिरे, राहुल पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले तर आभार शरद कुलकर्णी यांनी मानले.

[democracy id="1"]