९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिका-यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्रीची भेट घेतली.

अमळनेर: येथे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी व पदाधिका-यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. अमळनेर येथील साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मान्यवरांनी यावेळी दिले.
अमळनेर येथे होणार असलेल्या साहित्य संमेलनाच्या दृष्टीने मराठी वाड़मय मंडळाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या संमेलनासाठी शासन स्तरावरुन भरीव सहकार्य मिळावे व हे साहित्य संमेलन अविस्मरणीय व्हावे यासाठी नुकतीच मराठी वाड़मय मंडळाच्या पदाधिका-यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. चर्चेत साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारी व नियोजनाची माहिती देण्यात आली. अमळनेर येथे होत असलेले साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,अमळनेरचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील,नामदार संजय राठोड,नामदार दिपक केसरकर आदींची उपस्थिती होती