चोपडा तालुक्यातील लासूर येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना केले महत्त्वाचे मार्गदर्शन

अमळनेर: चोपडा तालुक्यातील लासूर गावात कृषिदूतांकडून शेतकयांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनि कृषिदूत आरती नवनाथ लांडगे, नम्रता चंद्रकांत कोळी, गायत्री मोतीलाल परदेशी, ऋतिका संजय चव्हाण, यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले.
माजी सरपंच श्रीमती जनाबाई सुखदेव माळी, माजी सरपंच श्री निंबाजी राजाराम वाघ, उपसरपंच अनिल जिजाबराव पाटील, ग्रामसेवक विश्वनाथ काशिनाथ चौधरी, प्रविण इंधा, लिलाधर पाटील, गुणवंत महाजन, तुषार पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. या कार्यक्रमात अमळनेर येथील
नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभांगी चव्हाण, रावे प्रोग्राम ऑफिसर मा.प्रा. गिरीष पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. संदिप साळुंखे, प्रा. तुषार देसले, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. शिवाजी गावीत प्रा. अमोल घाडगे, प्रा. सुनिल गावीत, प्रा. महेश चव्हाण,, प्रा. घनश्याम पवार, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा. सुदीप पाटील, प्रा. राम रजितवाड, प्रा. हर्षदा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत हे गावा-गावातील पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परिक्षण कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेती विषयक विविध समस्या तसेच त्यावरील उपाय, पीक प्रात्यक्षिक तसेच इतर शेती संबंधी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले

[democracy id="1"]