महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया कडून मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

पत्रकार भवनासाठी मुख्याधिकाऱ्यांना टाकले साकडे

अमळनेर : आज मुख्याधिकारी सो. नगरपरिषद अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने पत्रकार बांधवांच्या निवासासाठी मोकळा भूखंड व पत्रकार भवन बांधकामकामी मोकळा भूखंड मिळावा तसेच पत्रकार भवन बांधकाम कामी भूखंड हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस तोवर पालिकेच्या विविध व्यापारी संकुलातून सुस्थितीत असलेले एक संकुल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व वाईस ऑफ मीडिया यांच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद अमळनेर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपजी गायकवाड यांना दोन्ही संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयजी गाढेसर . विभागाचे सरचिटणीस रवींद्र मोरे तालुकाध्यक्ष .जयंतलाल वानखेडे ,कार्याध्यक्ष समाधान भाऊ मैराळे,तालुका सचिव सुरेश कांबळे.व्हाईस आँफ मिडीया सचिव जितेंद्र पाटील. सहप्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे ,विक्की जाधव,कमलेश वानखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

[democracy id="1"]