आधार संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी केले न्यूट्रिशन किट वाटप

एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांना सकस आहार किट वाटप

आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांचा उपक्रम


अमळनेर :आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी न्यूट्रिशन किट वाटप कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती पाटील व रोटरी प्रेसिडेंट प्रतीक जैन यांनी केले जात त्यांनी कार्यक्रम विषयी माहिती देऊन दात्याचे आभार मानले मागील दोन महिन्यापासून रेशन किट साठी धुळे येथील युकेला स्थायिक असलेले श्री रोहन साळुंखे यांनी भरघोस मदत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व या कार्यक्रमासाठी अधिक दात्यांची गरज असल्याचे आवाहन सगळ्यांना केले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री चेतन राजपूत होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमळनेर पत्रकार संघ आपल्या सोबत असून अजून अनेक दात्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रतीक जैन, राजेश जैन , देवांश शहा चेलाराम सैनानी ,विजय पाटील, डॉ दिलीप भावसार ,पुनम कोचर व,आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद या प्रकल्पाचे समन्वयक संजय कापडे ,राकेश महाजन, नंदिनी मैराळे ,पुनम पाटील ,मुरलीधर बिरारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी केले व या कार्यक्रमात प्रोटीन किट रमेश चंपालाल जैन यांच्या स्मृतिपत्यार्थ श्रीमती सविता जैन व त्यांचे परिवार यांच्याकडून देण्यात आले, दर्शन जैन व परिवाराने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या कार्यक्रमाचे दातृत्व स्वीकारले एचआयव्ही सह जगणाऱ्या , कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रतीक भाऊ जैन यांनी केले

[democracy id="1"]