तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत काढली भव्य कावड

अमळनेर : येथील शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही तापी नदी पात्र ते वर्णेश्वर महादेव मंदिरपर्यंत काढलेली भव्य कावड यात्रा श्रावणमास आरंभी उत्साहात संपन्न झाली.
माजी नगराध्यक्ष वर्णेश्वर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी मोजक्या शिवभक्तांसोबत २०१३ पासून सुरू केलेल्या कावड यात्रेस यंदा खऱ्या अर्थाने भव्य यात्रेचे स्वरूप आले होते. २५०० पेक्षा अधिक शिवभक्त यंदा यात्रेत उत्स्फर्तपणे सहभागी झाले होते.जळोद येथे तापी नदीवर जलपूजन करून सर्व शिवभक्तांनी आपापल्या कलशांमध्ये तापीमाईचे जल भरून कावड खांद्यावर घेत बँडच्या तालावर सर्व कावड यात्री उत्साहात वाजत गाजत व नाचत शिवघोषात मार्गस्थ झाले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदिपभैय्या पाटील व जळोद चे सरपंच मुन्ना साळुंखे यांनी सर्व शिवभक्तांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या.
जळोद येथे शिवभक्त शिवदास सुभेदार यांनी कावड यात्रेचे प्रणेते सुभाष चौधरींना घोड्यावर बसून मिरवणूक काढली तर सुभेदारांच्या आईच्या स्मरणार्थ सुभाष चौधरी यांच्याहस्ते वृक्षारोपण करून घेतले. यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेसह माजी आमदार स्मिताताई वाघ यांनीही वृक्षारोपण करून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्यात.याप्रसंगी शिवभक्तांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. कावड यात्रेनिमित्त अंमळगाव येथे शिवभक्त व उद्योजक श्रीराम चौधरी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते .त्यांच्यासोबत प्रवीण चौधरी ,भूषण सुरेश , चंद्रशेखर एकनाथ, इंजि .गिरीश पाटील,डॉ.संजय पवार,भाऊराव पवार उपस्थित होते. तर खा.शि .मंडळाचे चेअरमन डॉ.अनिल शिंदे,हरी भिका वाणी,विक्रात पाटील,सौ.सुनीता पाटील टेकडी ग्रुपचे आशिष चौधरी,विनोद थोरात,प्रवीण पाटील,गोरख पारधी, निंबा दला, पाडळसे समितीचे महेश पाटील, रवी पाटील, एन के पाटील, अजय सिंग पाटील, श्याम पूरकर,यांनीही यात्रेस भेट देवून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. कावड यात्रेचे गांधली येथे सुधाकर आबा रोहिदास पाटील व ग्रामस्थ यांनी चहा पाणी व्यवस्था करून स्वागत केले.यात्रा चोपडा रोड,सिंधी कॅम्प मार्गे वर्णेश्वर महादेव मंदिर येथे आली असता शिवभक्तांनी आपापल्या कलशांमधील जल महादेव पिंडीवर टाकून जल अभिषेक केला.
कावड यात्रेत साने नगर,तांबापुर नंदगाव, सुंदरपट्टी रडावन-राजोरे, गांधली अंमळगाव व अमळनेर शहरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी रामराव पवार, राजू देसले,रडावणचे रवींद्र पाटील, नंदगावचे दामोदर पाटील, सुखदेव पाटील,साने नगरचे नरेंद्र पाटील जगदीश पाटील, नाना पाटील ,भास्कर पाटील,नारायण बद्गुजर यांनी परिश्रम घेतले. शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार ,हेमंत भांडारकर,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,संजय निंबा , अजयसिंग पाटील,मुन्ना सोनार, भिकन वाडीले,सुभाष पाटील पिंपळनेर, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील,सुनील चौधरी यांचे सहकार्य लाभले.

[democracy id="1"]