????महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड तर ????खानदेश विभागीय सरचिटणीस पदी रवींद्र मोरे यांची निवड

अमळनेर : येथील पत्रकार विजय गाढे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यध्यक्ष पदी विजय गाढे यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंंडे, राज्य संघटक संजय भोकरे, महाराष्ट्र राज्याचे महासचिव विश्वासरावजी आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणजी सपकाळे, खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा यांच्या मान्यतेने रवींद्र मोरे यांची पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
विजय गाढे यांनी यापूर्वी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सलग दोन वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोफत आरोग्य शिबिर,पोलिस धर्मपत्नी सन्मान सोहळा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.पत्रकारांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो हे त्यांनी आपल्या लेखणीतून सिद्ध केले आहे.परखड लेखणी सह सत्याची कास धरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.
संघटनांच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी व संघटना वाढीसाठी पत्रकार संघाचे खान्देश विभागीय कार्याध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार तथा मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने कार्य सातत्याने करीत असतात.
विजय गाढे हे उच्च शिक्षित असून त्यांचा सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्वपूर्ण सहभाग असतो.लोकप्रिय दैनिक देशोन्नती च्या माध्यमातून ते लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यांचे संघटन कौशल्य व पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि कार्य पाहता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीपदी रवींद्र मोरे यांची निवड

रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खानदेश विभागीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
रवींद्र मोरे हे व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष देखील आहेत.
दोन्ही संघटनांच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी व संघटना वाढीसाठी ते संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि जेष्ठ पत्रकार तथा मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने कार्य करणार असल्याने त्यांनी सांगितले. रवींद्र मोरे यांना दै. लोकमत मधील पत्रकारितेचा सुमारे २० वर्षाचा अनुभव असून त्यापैकी त्यांनी ६ वर्ष उपसंपादक म्हणून कामही पाहिले आहे. एवढ्या प्रदीर्घ वर्षांच्या अनुभवानुसार त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून दै. ‘अमळनेर दर्पण’ ची सुरूवात केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव व कार्य पाहता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

[democracy id="1"]