अमळनेर येथे खदाणी लगत असलेल्या विहिरीत पडून शाळकरी तरुणाचा मृत्यु

एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला विहिरीत पडलेल्या तरूणांना मृतदेह

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे रेल्वे प्रवासात मदत व बचाव कार्याचे आदेश

अमळनेर :दि १६ ऑगस्ट २३ रोजी साने गुरुजी स्मारक गलवाडे रोड अमळनेर येथील खदानी लगत असलेल्या विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणांचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पारोळा येथील वंजारी शिवारालगत
रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता.मित्रांसह तो पोहायला गेला त्याचे मित्र खदानीत पोहत होते तर शुभम धोत्रे हा खदानी लगत असलेल्या विहीरीत एकटा पोहण्यास गेला असता विहीरीत उडी मारल्यावर तो वर आलाच नाही तेव्हा काही मुलांचा लक्षात आल्यावर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली.

मंत्री महोदय श्री. अनिल पाटील यांनी रेल्वे प्रवासात सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी व एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते.

एसडीआरएफ ने स्थानिक आदिवासी तरूणांच्या मदतीनं रात्री १०.३० वाजता मृतदेह शोधून काढला. त्यावेळी कुटुंबीयांनी हंबरडा फोडला पुनवर्सन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले आहे.

[democracy id="1"]