साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये घेतले कायदेविषयक जनजागृती शिबिर

अमळनेर: ‘साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर व रॅगिंग विरोधी कायदा व रस्ता वाहतुकीचे नियम ‘ दिनांक 12/8/2023 वार शनिवार या दिवशी ठीक एक वाजता एस एम गोरे सभागृह मध्ये तालुका विधी सेवा समिती अमळनेर वकील संघ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग अमळनेर माननीय श्रीमती अमिता यादव मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या .प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अँड. आर . व्ही . निकम सदस्य वकील संघ अमळनेर . व श्री . योगेश टिकले पोलीस उपनिरीक्षक . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय आप्पासाहेब गुणवंतराव पाटील व शालेय समिती अध्यक्ष माननीय नानासो अशोक बाविस्कर व शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर हे होते .आलेल्या पाहुण्यांचा सत्कार दोन्ही मुख्याध्यापकांनी केला . अँड. निकम सर यांनी रॅगिंग विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन केले . हा कायदा कधी आला व का अमलात आला याविषयी मार्गदर्शन केले रॅगिंग म्हणजे काय ?हे सांगितले रस्ता वाहतुकीचे नियम या विषयावर माननीय टिकले साहेब यांनी मार्गदर्शन केले 18 वर्षाच्या आत वाहन चालवू नये तो कायद्याने गुन्हा आहे व दंड सुद्धा होतो . ‘ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमती यादव मॅडम यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला व त्यांनी युवा दिवसाचे महत्व सांगितले तरुण वर्ग हा देशाचा कणा आहे हाच वर्ग देशाला पुढे नेऊ शकतो . तुमचे वय हे गुन्हा करण्याचे नाही स्वतःला सांभाळा . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे. एस .पाटील यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांनी केले .

[democracy id="1"]