पंतप्रधान पिक विमा योजना प्रचार वाहनाचे अमळनेरात उदघाटन

31 पर्यंत मुदत,शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- सौ. जयश्री पाटील

अमळनेर-पंतप्रधान पिक विमा योजना खरीब 2023-24 साठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे PMFBY प्रचार वाहन अमळनेर तालुक्यात कार्यरत करण्यात आले असून याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या ताईसो.सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री ठाकरे, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक तालुका युवकाध्यक्ष विनोद जाधव, रामेश्वरचे बाळू पाटील, तालुका युवक उपाध्यक्ष मुन्ना पवार, मनोज बोरसे आदीसह शेतकरी बांधव कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच पिक विमा तालुका प्रतिनिधी किरण पाटील उपस्थित होते.
दरम्यान या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै 2023 पर्यंत असून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन सौ जयश्री पाटील यांनी केले आहे.

[democracy id="1"]