आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली तीन वर्षाची शिक्षा
अमळनेर : रस्त्यात अवैध प्रवासी वाहन लावून
उलट वाहतूक पोलिसाला मारहाण करणाच्या चोपडा
तालुक्यातील धनवाडी येथील आरोपीला जिल्हा सत्र
न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
१३ ऑक्टोबर २०१० रोजी दुपारी १:४५ वाजता चोपडा
येथील शिवाजी चौकात राजाभाऊ उमा उखाळे वय ४३ रा
धनवाडी ता चोपडा याने त्याची ओमीनी क्रमांक जी जे ०२
ए१९६ ही रस्त्यावर उभी केली. त्यामुळे येणाच्या
जाणाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता.
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कर्तव्यावर असलेले
वाहतूक पोलीस मोहन दौलत जावरे यांनी त्याला हटकले
ववाहन बाजूला करायला सांगितले असता उखाळे याने
गाडी रात्री पर्यत येथेच उभी राहील असे सांगून हुज्जतघातली आणि पोलिसाची कॉलर पकडून पोलिसाला
|कानात मारले. त्यामुळे पोलिसाचा चष्मा तुटला. चोपडा
शहर पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळठा निर्माण
केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला
अमळनेर येथील जिल्हा संत्र न्यायालयात सुरू होता.
सरकारी वरकील राजेंद्र चौधरी यांनी सात साक्षीदार
तपासले. जिल्हा सत्र न्या पी आर चौधरी यांनी आरोपी
राजाभाऊ उखाळे याला तीन वर्षाची कैदेची शिक्षा व
३०० रुपये दंडाची शिक्ष सुनावली. दंडन भरल्यास एक
महिन्याची कैदेची शिक्षा दिली. पैरवी अधिकारी म्हणून
सहायक पोलिस उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे,
हिरालाल पाटील व नितीन कापडणे यांनी काम पाहिले.