शाळेकरी विद्यार्थ्यांचा राजकारण साठी उपयोग करण्याची मला आवश्यकता नाही – मा.ना. अनिल पाटील

मा.ना.अनिलदादा पाटील

महाराष्ट्रात राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे खानदेशातील एकमेव आमदार भूमिपुत्र
अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदा ना अनिल पाटील यांचे जळगावात आगमन झाले. त्यांचं भव्य स्वागत देखील करण्यात आले. मात्र मंत्री अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे. पण या बाबतीत ना अनिल पाटील हे खूप संवेदनशील आहेत ते आमदार व नामदार होते नव्हते तेव्हापासून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमी भेटत असत. नेहमी विद्यार्थ्यांची संवाद साधत त्यांच्यात आपला वेळ घालवत असत.मुलांच्या खाण्यापिण्याबाबतीत वैयक्तिक आपले श्रमदान करतात मुलांचे आवर्जून काळजी घेतात.त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नामदार अनिल पाटील मंत्री झाल्याबाबत कळले व मंत्र्यांच्या ताफा कसा असतो व कसे गाड्यांचे सायरनचा आवाज मुलांना आकर्षित करतात हे बघण्याची उत्सुकता शाळेतीलमुलांना लागलेली होती व ते शाळेच्या भिंतीक बसून नामदार अनिल पाटील यांच्याकडे बघत होते याबाबत आमच्या प्रतिनिधीने काढलेल्या
छायाचित्रात आपण बघू शकतात.

नामदार अनिल भाईदास पाटील यांनीदिलेली प्रतिक्रिया

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदाच आपल्या अमळनेर मतदारसंघात आले असता त्यांच्या
स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आले होते. मात्र याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नसून अशा पद्धतीने मुलांना उभे करण चुकीचे आहे. मला माध्यमातून माहिती कळत असून याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो वाढदिवसानिमित्त किंवा इतर वेळेस त्यांच्यासोबत जेवण करत असतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राजकारण साठी उपयोग करण्याची मला आवश्यकता नाही
अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

[democracy id="1"]