भूमिपुत्र नामदार अनिलदादा पाटील यांचे अमळनेर शहरात ठीक ठिकाणी जोरदार स्वागत

मा.ना अनिल पाटील यांनी अमळनेरच्या भूमीला केले वंदन

मा.ना.अनिल पाटील अमळनेरच्या भूमीला वंदन करताना

अमळनेर: मंत्रिपद मिळाल्यानंतर शुक्रवारी
सकाळी प्रथमच अमळनेर येथे आलेले अनिल पाटील हे
लोणे येथे गाव शीव जवळ पोहचतात भूमीवर डोके टेकवत नतमस्तक झाले,
मंत्री अनिल पाटील यांचे ७ रोजी सकाळी रेल्वेने जळगाव
येथे आगमन झाले. अजिंठा विश्रामगृहात थोडा वेळ थांबून ते शासकीय वाहनांच्या ताफ्यासह अमळनेरकडे रवाना झाले.अमळनेर तालुक्यांच्या हद्दीत पोहचताच ते वाहनातून खाली उतरले आणि डोके टेकवत अमळनेरच्या भूमीला वंदन केले. यावेळी ते भावनिक झाले होते.

यावेळी अमळनेर येथील मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील,मार्जी नगराध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील,
कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, माजी नगरसेवक मुन्ना शम्मा, लोणे
सरपंच भाईदास भिल यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी
स्वागत केले. त्यांनतर टाकरखेडा येथे त्यांनी सती मातेचे
दर्शन घेतले व अमळनेरात आलेत.

भूमिपुत्र नामदार अनिलदादा पाटील यांचे अमळनेर शहरात ठीक ठिकाणी जोरदार स्वागत

अमळनेर: येथील आ. अनिल भाईदास पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ते पहिल्यांदा अमळनेर येथे आले असता, त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.! यावेळी राष्ट्रवादीच्या आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते नव्याने मंत्रीपदाची शपथ घेणारे
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल् भाईदास पाटील यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच अन्न व नागरी पुरवठा हे महत्त्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता मुंबई येथील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे नामदार अनिल भाईदास पाटील यांचा आज दिनांक ७ जुलै रोजी वाढदिवस असून मंत्री महोदय यांचे अंमळनेर येथे आगमन झाले अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरात दाखल झाल्यावर तेथे मंगळ देव ग्रहाची आरती करून तेथून नऊ वाजता बाईक रॅली द्वारे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पुढे पैलाड येथून दगडी दरवाजा पाच कंदील चौक सुभाष चौक कुंटे रोड व बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन हजारो कार्यकर्त्यांनी नामदार अनिलदादा पाटील यांचे जोरदार स्वागत केले.

श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे  स्वागत व नवकार कुटिया लोकार्पणासह झाली प्रसाद तुला

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे ७ जुलै रोजी प्रथम आगमन व वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. नामदार पाटील यांच्या शुभहस्ते नव्याने सुशोभीकरण केलेल्या नवकार कुटियाचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचा अधिकृत प्रसाद असलेल्या गोडशेवने त्यांची तुलाही करण्यात आली. या गोडशेवचे उपस्थित हजारो समर्थक व भाविकांना वाटप करण्यात आले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी अमळनेरला आल्यावर सर्वप्रथम श्री मंगळ ग्रह मंदिरात जाऊन दर्शन घेईल व तेथूनच अभिवादन मिरवणुकीला प्रारंभ होईल, असे नामदार पाटील यांनी जाहीर केले होते .त्याप्रमाणे सर्वप्रथम ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून त्यांना वाजतगाजत मंदिराजवळ आणण्यात आले. तेथे त्यांना मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या मंदिराच्या सेवेक-यांनी नामदार पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व त्यांच्या परिवारातील सदस्यांवर जोरदार पुष्पवृष्टी केली. रस्त्यावर संस्थेतर्फे मोठमोठे फलक व नामदार पाटील यांचे कटआऊट्स‌ लावण्यात आले होते. मंदिराचे मनोहारी सुशोभिकरण केले होते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्त मंडळ व सेवेक-यांच्या सौभाग्यवतींनी नामदार पाटील यांचे औक्षण करून त्यांच्यावर अक्षता व पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मंदिरात नामदार पाटील व त्यांच्या परिवाराने संकल्प सोडून छोटेखानी पूजा केली. मंदिराचे पुजारी गणेश जोशी,जयेंद्र वैद्य व तुषार दीक्षित यांनी पौरहित्य केले.यावेळी नामदार पाटील यांच्या सन्मानार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. वाढदिवसानिमित्त नामदार पाटील व जयश्री पाटील यांना एकत्रित भव्य पुष्पहार, श्री मंगळदेवाची मोठी प्रतिमा तसेच शाल, श्रीफळ देऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे, आनंद महाले, विनोद कदम, उमाकांत हिरे, निलेश महाजन, चंद्रकांत महाजन, राहुल पाटील, उज्ज्वला शाह आदींनी स्वागत केले.
यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित होते.

दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे समितीचे हेमंत भांडारकर देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र देसले, नारायन बडगुजर यांचेसह मोठ्यासंख्येने पाडळसरे धरणाच्या मागणीच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार केला.

मा.आमदार साहेबराव दादा पाटील यांच्या राजभवन येथे नामदार अनिल पाटील यांचे स्वागत

मा..ना. श्री अनिलदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून फटाक्यांची आतिषबाजी व प्रदूषण न करता अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आणि मदत व पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या नैसर्गिक कामात आपलाही हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना.अनिलदादा पाटील यांना देतांना सोबत, जि.प सदस्या जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील,प्रा.अशोक पवार, भागवत सूर्यवंशी,डि. एम. पाटीलसर, श्यामकांत पाटील, ऍड.यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक निशांत अग्रवाल, राजूभाऊ वाणी, रवी पाटील, प्रभाकर पाटील यांचेसह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

कृ.उ.बाजार समितीच्यावतीने मा.ना.अनिल पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने केली लाडू तुला

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नामदार मा.ना.अनिल भाईदास पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला करण्यात आली असून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी  प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा बाजार समितीतर्फे मोफत सुरू करण्याचा शुभारंभ देखील करण्यात आला.
            याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने शेतकऱी नागरिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

[democracy id="1"]