अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले

अमळनेर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 जून रोजी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अमळनेर लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील इस्लामपुरा जवळील जपान जीन जवळ राहणारे मोहम्मद शोएब शेख आपल्या बहिणीसह अमरावती एक्सप्रेसने जात असताना स्थानकावर गाडी आली असता घाई गडबडीत चढताना चोरट्याने त्यांच्या बहिणीकडे असलेल्या पर्स मधून सहाशे रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांचं 34385 चोरून नेले आहे. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताचं मोहम्मद शेख यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सर्वच रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मात्र अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने चोरटे याचा फायदा घेत रेल्वे प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ अमळनेर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवासांचे सुरक्षितता जोपासावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे

[democracy id="1"]