श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग

अमळनेर: येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विष्णू महायाग झाला. मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर चिराग नारायण या महायोगाचे मानकरी होते. यावर्षी गुरुवारी आषाढी एकादशीचा योग आला आहे. गुरुवार हा विष्णूला प्रिय असलेला वार आहे .त्याचे औचित्य साधून मंदिराने श्री विष्णू महायगाचे आयोजन केले होते. या महायागाचे मंदिरातील हे प्रारंभ वर्ष होय. यानंतर आता दरवर्षी हा महायाग होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले .
दरम्यान महायागानिमित्त खूप मोठी सजावट करण्यात आली होती. श्री विठ्ठलाचा भव्य कटआउट लावण्यात आला होता. या महायोगाला शहरातील व परगावच्या अनेक भाविकांची खूप मोठी उपस्थिती होती. सर्वांनी तीर्थप्रसाद व अनेकांनी महाआरतीचा लाभ घेतला. प्रसाद भंडारी,जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, तुषार दिक्षित, विनोद जोशी व विनोद पाठक यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, कोषाध्यक्ष गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आणि सेवेकरी विनोद कदम, आशिष चौधरी, डॉ .अनिल वाणी, ऍड.प्रदीप भट, ऍड.ए. के. बाविस्कर, आर.पी. नवसारीकर ,योगेश येवले, बंधू टेलर आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

[democracy id="1"]