अमळनेर: प्रती पंढरपुर म्हणून ओळखली जाणाऱ्या अमळनेरातील श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडीवरील यात्रोत्सव, आज शुक्रवार दिनांक ३० जुन२०२३ रोजी होणार असून या निमित्ताने निघणाऱ्या श्री मधुकर नारायण सोनवणे ( गुरु ) यांच्या उत्सव मिरवणूक साजरा करण्यासाठी आज दि. ३० जून रोजी दुपारी ४.०० वाजता राहते घरी शारदा कॉलनी ,वड चौक, अमळनेर येथे सर्व भाविक भक्तांनी आवश्यक सहभागी व्हावे ही विनंती सौ स्वप्ना विक्रांत पाटील व नानासो विक्रांत भास्करराव पाटील यांचे कडून करण्यात येत आहे. यात्रेत भाविकांनी अंबरीष ऋषी मंदिरात दर्शनासोबत टेकडीवरील हिरवळतेचाआनंद लुटावा.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सायं. ४ ते रात्री ९ या काळात भरणारी ही यात्रा अमळनेर शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. शहरातून अनेक कुटुंबिय यात्रेला हजेरी लावतात यात्रेच्या काळात पाऊस असो की नसो गर्दीचा उत्साह वाढतच जातो. यात्रेतील गरमागरम भजी, वडापाव, पात्रा भजी, चिवडा, गुळाची जिलेबी हे खाद्यपदार्थ यात्रेचे आकर्षण आहेत. सोबतच टेकडीवरील गार हवेच्या झोकात हात उंचावून फुग्याची काकडी धरून ती वाजवणे हे येथील यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. तसेच लहान मोठे पाळणे आणि खेळण्यांची दुकाने लावली जातात. यामुळे बच्चे कंपनी दरवर्षी या यात्रोत्सवाची वाट पाहते.
सर्वांनी पावित्र्य जपावे
टेकडीवर यात्रेला किंवा यात्रे नंतर कधीही आल्यावर नाश्ता व जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद, इतर वस्तू रद्दी पेपर इतरत्र न टाकता, सोबत आणलेल्या पिशवीत भरून श्री. अंबरीषजी ऋषी महाराज टेकडी ग्रुपच्या सदस्यांकडे द्यावे. किंवा मंदिराजवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागिल बाजूस नेऊन टाकावी अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच वृक्षांचे नुकसान टाळण्यासाठी आपली वाहने टेकडीच्या खालीच लावावी, अशी विनंती मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांचे कडून करण्यात येत आहे.