आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने अमळनेर शहरात पोलिसांचा रूट मार्च

महावितरण कार्यालय परिसरात सापडले रक्तरंगाने माखलेले पोतेहोता मॉक ड्रिल

अमळनेर: महावितरण कार्यालयात कोणीतरी रक्ताने माखलेल्या पोत्यात काहीतरी सोडून गेला आहे, अन सर्वत्र धावपळ सुरू झाली. पोते उघडले तर काय पोत्यात प्लास्टिक कचरा भरलेला होता. पोलिसांची सतर्कता आणि गावातील नागरिकांची भूमिका  तपासण्यासाठी ते मॉक ड्रिल होते असे कळताच् नागरिकांच्या जीवात जीव आला.
     पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना खुनाची बातमी कळवताच त्यांनी ताबडतोड डीवायएसपी सुनील नंदवाळकर  याना सुभाष चौकाजवळील वीज मंडळ कार्यलयाजवळ बोलावले. डी बी पथक , बिट अंमलदार , वाहतूक पोलीस ,क्राईम शाखा , गोपनीय शाखा आदी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी हजर होण्याचे आदेश दिले. वीज मंडळ कार्यालयात कोणाचा तरी खून करून प्रेत पोत्यात फेकून देण्यात आले आहे. त्याचा  शोध घ्यायला सांगण्यात आले. वीज कर्मचारी आणि अधिकारी गोंधळले. मुतारी च्या मागे लाल डाग पडलेले पोते सापडले.घटनेचे वृत्त समजताच पत्रकार देखील पोहचले होते. सर्वांच्या समक्ष पोते उघडण्यात आले. पोत्यात प्लास्टिक कचरा निघाला तर पोत्यावर लाल रंग टाकण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांची सतर्कता , तत्परता ,संवेदनशीलता आणि गावातील नागरिकांची भूमिका तपासण्यासाठी मॉक ड्रिल असल्याचे सांगितल्या नंतर नागरिकांच्या जीवात जीव आला.

अमळनेर शहरातील सवेदनशील व समिश्र वस्ती भागात रूट मार्च

अमळनेर शहरात आषाढी एकादशी व बकरी ईद सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काल शहरातील सवेदनशील व समिश्र वस्ती भागात रूट मार्च काढण्यात आला.

अमळनेर शहरातील गांधलीपुरा चौकी-दगडी दरवाजा – सराफ पट्टा – जामा मशीद – कासाली डि पि – आखाडा मैदान – माळी वाडा – झामी चौकी पावेतो असा सवेदनशील व समिश्र वस्ती भागात रूट मार्च घेण्यात आला.

सदर वेळी मा. श्री.सुनील नंदवाळकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे सर अमळनेर पोस्टे कडील 5 अधिकारी 32 अंमलदार, मारवड पोस्टेकडील श्री. शितलकुमार नाईक यांच्या सोबत 5 अंमलदार, पारोळा पोस्टे कडील 1 अधिकारी 3 अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अमळनेर कडील 1 अधिकारी 5 अंमलदार, 3 आरसीपी पथक व 25 होमगार्ड हजर होते..

यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस निरीक्षक विजय शिंदे , सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी , शितलकुमार नाईक , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे ,पो उ नि भैयासाहेब देशमुख , पो उ नि विलास पाटील , पो उ नि विकास शिरोळे , पो उ नि अक्षदा इंगळे , विनोद पाटील ,जाधव आदि अधिकारी ,पोलीस कर्मचारी ,महिला पोलीस ,होमगार्ड आणि तीन आर सी पी प्लातुन सहभागी झाले होते.

[democracy id="1"]