अमळनेर शहरात पोलिसांनी केली नाकाबंदी

एकही वाहन चेक केल्याशिवाय सोडू नये. सक्तीचे आदेश- वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे

अमळनेर: शहरात दिनांक २८/०६/२३ पासून सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डी वाय एस पी श्री सुनील नंदवाडकर साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये अमळनेर शहरात सुभाष चौक पाच पावली देवी चौक महाराणा प्रताप चौक या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
त्यात सुभाष चौक येथे पीएसआय श्री अनिल भुसारे साहेब यांनी पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांना सोबत घेऊन नाकाबंदी केली असता अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पीएसआय श्री. भुसारे साहेब वाहन चेक करताना

तसेच पाच पावली देवी चौक येथे पी एस आय विकास शिरोडे साहेब यांनी पोलीस कर्मचारी सोबत नाका बंदी केली असता अनेक वाहने चेक करण्याचे काम सुरू होते. जेणेकरून शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी.

त्याच प्रकारे महाराणा प्रताप चौक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री राकेश सिंग परदेशी साहेब व भैय्यासाहेब देशमुख साहेब व त्यांचे पोलीस कर्मचारी सोबत फटाके फोडणारी बुलेट गाडी, बिना नंबर प्लेट मोटरसायकल, बिना लायसन धारी, तसेच ट्रिपल सीट जाणाऱ्या मोटर सायकलीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एपीआय राकेश सिंग परदेशी साहेब व देशमुख साहेब कारवाई करताना