हिंदी अध्यापक मंडळाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा झाला सत्कार

हिंदी मंडळाच्या शुभेच्छा नेहमीच प्रेरणादायी एन.आर.चौधरी

अमळनेर: हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने माझ्याकडे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी आल्यानंतर मंडळाने केलेला सत्कार नेहमीच प्रेरणादायी राहील असे हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा नुकतेच मुख्याध्यापक म्हणून निवड झालेले निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.आर चौधरी सत्कार प्रसंगी बोलत होते
दरवर्षी हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अंमळनेर तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येतात 14 सप्टेंबर हिंदी दिवस , सेवानिवृत्त शिक्षकांना हिंदी पुरस्काराने सन्मानित केले जाते .विविध स्पर्धेत यशनिवड झालेले विद्यार्थी यांचाही सत्कार हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने करण्यात येतो. अध्यापक मंडळाच्या सभासदांच्या सुखदुःखात मंडळ पाठीशी असते.
यावर्षी हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने नुतन मुख्याध्यापक व पुरस्काराने सन्मानित झालेल्या हिंदी शिक्षकांचा सत्कार नुकताच अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाचे तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने
श्री एन आर चौधरी मुख्यध्यापक माध्यमिक विद्यालय निंभोरा तथा जिल्हा कार्यकारी सदस्य, हिंदी अध्यापक मंडळ,
एन वाय पाटील मुख्याध्यापक बालाजी विद्यालय गांधली पिळोदे, भास्कर चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक
माध्यमिक विद्यालय निंभोरा,पुरस्काराने सन्मानित झालेले पत्रकार ईश्वर महाजन महात्मा फुले विद्यालय देवगांव देवळी, मनीष उघडे साने गुरुजी विद्यालय अंमळनेर यांचा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीनेसत्कार करण्यात आला.
यावेळी आशिष शिंदे अध्यक्ष हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर, ज्ञानेश्वर इन्सुलकर उपाध्यक्ष हिंदी अध्यापक मंडळ,अंमळनेर, दिलीप पाटील सचिव हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर,दिपक पवार माजी अध्यक्ष हिंदी अध्यापक मंडळ
राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष हिंदी अध्यक्ष मंडळ,अंमळनेर ,कमलाकर संदानशिव, प्रदीप चौधरी सोपान भवरे, तडवी मुनाफ,
प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पवार यांनी केले तर आभार सोपान भवरे यांनी मानले.

[democracy id="1"]