परस्परातील द्वेषयुध्दी नष्ट होणेसाठी
‘समत्व बुध्दियोग’ जोपासण्याची आवश्यकता

प.पू. आनंद जीवन स्वामी

अमळनेर:आपल्या ऋषीमुनींनी जोपासलेली ‘योगसाधना’ भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे.
पतंजली ऋषींनी रूजविलेली ‘योगसाधना’ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य झाली आहे.
प्राणायामाच्या माध्यमातून शरीर व मनोबल देणारा ‘योग’ महत्वाचा आहेच. भगवान श्रीकृष्णाने
त्यासाठीच अर्जुनाला ‘तस्माद योगी भव’ असा संदेश दिला. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी ‘समत्वं
योग उच्चते’ व योगः कर्मेषु कौशल्यम्’ असा योग सांगीतला आहे. तो आजच्या स्थितीत
परस्परातील द्वेषबुध्दी महत्वाचा आहे. आत्मीक विकासाठी व भगवत्भक्ती वाढविणेसाठी तो
आवश्यक आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ‘समत्व जोपासणारी बुध्दी निर्माण करा भगवतभक्ती
वाढवा आत्म्याचे परमात्म तत्वांशी एकरूपत्व निर्माण करा, त्यासाठी प्रत्येकाने ‘समत्व बुध्दीयोगाचा
स्विकार करावा’ असे विचार आंतरराष्ट्रीय योगदिनाचे व संगीत दिनाचे औचित्य साधून धुळे
येथील स्वामी नारायण मंदिराचे कोठारी प.पू. आनंदजीवन स्वामींनी अमळनेर येथे आयोजित

सत्संग सभेत मांडलेत.

यावेळी परिसरातील असंख्य स्वामी नारायण संप्रदायातील हरिभक्तांची उपस्थिती होती.
प.पू. योगीस्नेहस्वामी, साधू उत्तम मुनी, निर्दोष वदन स्वामी, ह्यांनीही सभेला मार्गदर्शन केले.
श्री. बागड सरांनी सभेचे सूत्र संचालन केले. याप्रसंगी श्री. प्रविण सोनी, हरि भिका वाणी, प्रा.
डॉ. प्र. ज. जोशी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. श्री. अतुल सोनी, श्री. चंद्रकांत लोहार,
श्री. चंद्रकांत वाणी, श्री. जगदीश चौधरी, श्री. हरीकृष्ण सोनी, श्री. प्रितम मणीयार, श्री. चंद्रकांत
वाघ यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

[democracy id="1"]