या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या शहराचा विकास झाला नाही.

असे प्रतिपादन नासिक परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जि. शेखर-पाटील यांनी के

अमळनेर दि.२२
“ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या शहराचा विकास झाला नाही. पालकांनी आपली मुले रात्री कुठे जातात?काय करतात? याकडे लक्ष दिले पाहिजे. चुकीच्या घटना घडू नये म्हणून आता रात्री ११वाजेनंतरचे निर्बंध केले जातील.तरुणावर असलेला एक गुन्हा त्याचे पुढील आयुष्य बरबाद करून टाकतो.बॉर्डरवर सैनिक,अधिकारी उभा असतो त्याला देशाच्या सुरक्षेची काळजी असते तर इथे रस्त्यावर वर्दीतला पोलीस उभा असतो त्याला अंतर्गत सुरक्षेची काळजी असते.देशाची अंतर्गत सुरक्षा चांगली असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो. ‘देशाची सुरक्षा, आपली सचोटी ,एक कॅमेरा पोलिसांसाठी …! हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे . आम्हाला जळणारे अमळनेर पहायचे नाही अमळनेरकरांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे आहे. ” असे प्रतिपादन नासिक परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जि. शेखर-पाटील यांनी केले.अमळनेर येथे दि ९जून ला दंगल झाली होती त्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर धार्मिक व जातिय सलोखा शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. दि.२२ ला हॉटेल मिड टाऊन येथे सदर कार्यक्रम पोलीस प्रशासना तर्फे आयोजित करण्यात आला होता.
यापुढे बोलताना शेखर पाटील म्हणाले की
त्रिपुरा येथे अरब देशातील व्हीडिओ सोशल मीडिया वर आल्यावर तेथे दंगल झाली व तो बनावट व्हीडिओ इकडे मालेगाव ला व्हायरल झाला त्यामुळे तेथे दंगल झाली . या चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे सर्व सामान्य माणसाचे यात नुकसान झाले . दंगली झाल्यावर असे म्हटले जाते की पोलिसांचे काय नुकसान झाले ? पण आमच्या अंतकरणातील जी आग पेटलेली असते ती कधीच शांत होत नसते जेव्हा सगळा समाज शांत होईल तेव्हाच ती पेटलेली आग शांत होईल असे आम्हाला वाटते. दंगलीमुळे अमळनेरचे नावलौकिक कमी झाले ते पुन्हा आणायला हवे. याला त्याला दोष देण्यात अर्थ नाही स्वतःच स्वतःचे विश्लेषण करायला हवे” .
त्या पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार ,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार डॉ बी.एस. पाटील, स्मिता वाघ,
अतुल ठाकूर,इम्रान खाटीक , रणजित शिंदे,शकील काझी, लालचंद सैनांनी,प्रवीण पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडेकर, न.पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर (अमळनेर), ऋषीकेश रावले (चोपडा), नायब तहसीलदार अमोल पाटील,पारोळा पोलीस निरिक्षक वाकोळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सूत्र संचलन संजय पाटील यांनी केले व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आभार मानले.

(यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे , दीपक काटे यांना सन्मानित करण्यात आले)

[democracy id="1"]