अमळनेर येथील दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची वंचित आघाडीने केली मागणी

दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करून अशपाकला न्याय द्या वंचित बहुजन आघाडीने केली मागणी

अमळनेर: येथे दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकित पोलिसांनी जवळ जवळ ७० ते ८० लोकांवर गुन्हा नोंदवला आहे.त्यापैकी ३२ संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.पैकी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा संशयित आरोपी अशपाक याचा कारागृहात असताना मृत्यू झाला आहे,त्याच्या मृत्यू सह दंगलीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्च स्तरीय चौकशी करून यात दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करावे,मृत अशपाक याच्या वारसास सरकारी सेवेत रुजू करावे,मयताच्या कुटुंबाला ५० लक्ष रुपये शासनामार्फत मदत म्हणून द्यावी,निरपराध असलेल्या संशयित आरोपीं वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे,घटनास्थळी असणारे खरे दंगलखोर आणि सीसीटिव्ही फुटेज मध्ये निदर्शनास आलेले विकृत मानसिकतेतील दंगल घडविणारे यांना तात्काळ अटक करून निरपराध नागरिकां वरील आरोप मागे घेऊन त्यांची त्वरित सुटका करावी, अश्या आशयाचे निवेदन वरिष्ठ पोलिस महानिरीक्षक नाशिक बी जी शेखर पाटील यांना झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हा प्रभारी रविकांत वाघ,जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,अमळनेर तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे,शहर अध्यक्ष संदीप सैदांने, पूनमचंद निकम,भीमराव वानखेडे,मोहंमद शेख आदी उपस्थित होते.

[democracy id="1"]