लोकाभिमुख कार्याबद्दल सत्कार

लोकाभिमुख कार्याबद्दल  पोलीस पाटील भानुदास आबा पाटील यांचा केला सत्कार

अमळनेर: सेवानिवृत्ती समारंभ खर्च टाळून नांगरली नदी सेवानिवृत्तीवरील अनावश्यक खर्च टाळत इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथे लोकाभिमुख काम सुरू केल्याबद्दल व सेवानिवृत्ती बद्दल पोलीस पाटील भानुदास आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. इंद्रापिंप्री तालुका अमळनेर येथील पोलीस पाटील भानुदास पाटील यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या प्रेरणेने गावात लोकाभिमुख काम सुरू केल्याने जिल्हा ग्रंथालय संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष शशिकांत पाटील व धनगर समाज कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष डी ए धनगर यांनी भानुदास पाटील यांचा सत्कार केला. त्यांच्या समवेत धनराज गंगाराम पाटील या शेतकऱ्याने सुद्धा सत्कार्यासाठी मदत केल्यामुळे त्यांचाही सत्कार केला. निवृत्त पोलीस पाटील यांच्या निर्णयाने 10 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊन 50 हेक्‍टर शेती सिंचनाखाली येणार आहे. जेवणावळीवरील खर्च टाळत गावातील नदी, नाला, तलाव नांगरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर होऊन शेती सिंचनाखाली येणार आहे. असे हे लोकाभिमुख कार्य केल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थां देखत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या लोकोपयोगी कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

[democracy id="1"]