माजी आमदार स्मिता वाघ यांचा पत्रकार परिषदेत आरोप
अमळनेर : महाविकास आघाडीच्याकाळात निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणास लागणाऱ्या विविध मान्यता न वेळेवर न दिल्याने १५०० कोटी रुपयांचा निधी मिळू शकला नाही आणि त्यामुळेच प्रकल्प रखडला व त्याची किंमत ५५०० कोटींपर्यंत गेल्याच्या आरोपात भाजपच्या प्रदेशउपाध्यक्ष माजी आमदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारला नऊ वर्ष झाल्याबद्दल या काळातील कामांचा आढावा व विकास जनतेसमोर मांडण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यासाठी भाजप ने आयोजित केलेल्या पत्रकार
परिषदेत स्मिता वाघ बोलत होत्या.
भाजप योजना आखून विकासकामांना उजळणी देत असून २१ रोजी सामूहिक योगा प्रशिक्षण आणि २६ रोजी माजी खासदार सरोज पांडे यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाची बाईक रॅली आयोजित केली आहे अशी माहितीही स्मिता वाघ यांनी दिली. २६ रोजी भाजप च्या विविध आघाड्या, मोर्चा व समित्यांचे संमेलन अमळनेरात आयोजन करण्यात आले आहे. तर २३ रोजी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध बुथवर कॉन्फ्फरन्सिंग आयोजित केले आहे. जेष्ठांचे संमेलन, व्यापारी मेळावा, लाभार्थी संमेलन, प्रभावशाली व्यक्ती भेटी आदी प्रकारचे मायक्रो नियोजन भाजप ने केले असल्याचेही सांगण्यात आले. जळगाव मतदार संघाचे खासदार उमेश पाटील यांचे अमळनेर तालुक्यावर दुर्लक्ष असून ते इकडे चमकत नाहीत असा जनतेचा आरोप आहे यावर बोलताना वाघ यांनी सांगितले की लवकरच खासदार तालुक्यात भेटी घेतील त्यांची काही कामे देखील होणार आहेत त्या कामाचे उदघाटन करण्यासाठी येतील असा खुलासा केला. पत्रकार परिषदेस भाजयु मोर्चाच्या भैरवी वाघ- पलांडे, माजी सभापती श्याम अहिरे, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, बाजार समिती संचालक शरद पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शीतल देशमुख जिजाबराव पाटील, शहर सरचिटणीस राकेश पाटील, राहुल पाटील, विजय राजपूत, शिवाजी राजपूत हजर होते.