विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
अमळनेर: येथील अमळनेर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात सामाजिक कार्यकर्ते व सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार रणजित भास्कर शिंदे विरुद्ध इतर आठ उमेदवार अशी लढत होत असल्याने सदर मतदारसंघातील निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.राखिव मतदारसंघातील लढतीच्या केंद्रस्थानी प्रमुख उमेदवार म्हणून रणजित शिंदे हेच असल्याचे चित्र असून सहकार पॅनल ने त्यांची केलेली निवड सरस ठरली आहे.
रणजित भास्कर शिंदे यांची लढत थेट सोमचंद संदानशिव, नरेश कांबळे , राजेंद्र परदेशी यांचेशी होत आहे. तरी या मतदारसंघात प्रत्येक उमेदवार हा रणजित शिंदे यांच्याशीच आपली थेट लढत असल्याबाबत ठामपणे सांगताना दिसतो.
सत्ताधारी सहकार पॅनलच्या नेत्यांनी बँकेचे स्व. संचालक शांताराम ठाकुर यांच्या जागेवर मागिल निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या रणजित शिंदे यांना पॅनलमध्ये विचारपूर्वक समाविष्ट करून घेतले आहे.पॅनलच्या नेत्यांचा व वरदहस्त ,सहकारी तुल्यबळ उमेदवारांची साथ आणि शिंदे यांची उच्च शिक्षित, सततचे सामाजिक कार्य , विविध चळवळी, आंदोलन तसेच समाजोपयोगी उपक्रमांमधून निर्माण झालेल्या व्यापक लोकसंपर्कासह समन्वयाची भूमिका घेणारे व सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले रणजित शिंदे हे प्रत्येक विरोधी उमेदवाराचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरलेले असून त्यांचे पारडे इतर उमेदवारांच्या तुलनेने बरेच जड आहे.एकंदरीत शिंदे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.