प्रभाग क्रमांक १५ मधील सावतावाडी भागातील अंतर्गत रस्ते वर चेकर टाईल्स बसविणे कामाचा शुभारंभ
अमळनेर: माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्षा सौ पुष्पलताताई पाटील यांचे कडील माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या सततच्या पाठपुरावा व मागणीनुसार मंजूर झालेल्या अमळनेर नगर परिषद हद्दीतील जुना प्रभाग क्रमांक १५ मधील सावतावाडी भागातील अंतर्गत रस्ते वर चेकर टाईल्स बसविणे कामाचा शुभारंभ माजी उप नगराध्यक्ष डॉ रामदास शेलकर, विक्रांत भास्करराव पाटील व स्थानिक रहिवाशी श्री. लक्ष्मण चौधरी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी नगरसेवक प्रताप आबा शिंपी सहकार्य या कामी लाभले. याप्रसंगी कैलास महाजन, प्रकाश महाजनसर, भूषण महाजन, प्रवीण ठाकूर, गौरव महाजन, ईश्वर चौधरी, सद्दाम शेख, साईद पठाण, दग्गु पठाण, जाकिर अली सैय्यद अली, नझिम शेख आदीसह नागरीक उपस्थित होते.