राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न
अमळनेर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सह माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या १६ जुन रोजी होणाऱ्या अमळनेर दौरा नियोजन संदर्भात आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ची बैठक उत्साहात पार पडली.
यावेळी नवनियुक्त बाजार समिती सभापती तसेच संचालक यांचा सत्कार व १२ जून रोजी प्रशासकीय इमारतीसाठी करण्यात येणाऱ्या उपोषण आंदोलनावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार शरद पवार अनेक वर्षानंतर अमळनेरात येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सर्व सेलचे अध्यक्ष व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शेतकी संघ प्रशासकीय सदस्य मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हॉईस चेअरमन, संचालक मंडळ आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते..