वसंतनगर माध्यमिक आश्रम शाळेचा 92 टक्के निकाल

छत्तीस वर्षाची यशाची परंपरा अखंड

पारोळा प्रतिनिधी: वसंतनगर ता. पारोळा येथील
वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित, माध्यमिक आश्रमशाळा वसंतनगर ता. पारोळा येथील विध्यार्थ्यांनी छत्तीस वर्षांची यशाची परंपरा कायम राखली आहे. येथील दहावीचा एकूण 92 टक्के निकाल लागला आहे. यात प्रथम क्रमांक कु. स्वाती किशोर जाधव 90%, द्वितीय भीमराव अनिल करंजे 87.60%, तृतीय कु. सुषमा शेषराव खैरनार 81.20%, चतुर्थ मनोज अशोक पवार 79.20%, पाचवी नेहा भरत जाधव 79% मिळाले आहेत.
यात–19 विध्यार्थी विशेष प्रावीण्य तर, 49विद्यार्थी प्रथम श्रेणी,04 द्वितीय श्रेणी मिळवली आहेत.
मागील आठवड्यात बारावीचा निकालातही शंभर टक्के निकाल लागला आहे. गेल्या छत्तीस वर्षापासून दहावी तर चौदा वर्षापासून इयत्ता बारावीच्या निकालात उतुंग यश मिळत असल्याने वसंतनगरसह, भोलाणे, पिंपळकोठा, जामदे, जिराळी, इंधवे, मुकटी आदी परिसरातून विध्यार्थ्यांसह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे. इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त कु.स्वाती व पालक आई वडिल, सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाॅफ यांचे गटविकास अधिकारी व वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष देशमुख जाधव, यांनी अभिनंदन केले आहे.

[democracy id="1"]