अमळनेर: ( पारोळा प्रतिनिधी )- गजानन माध्यमिक विद्यालय राजवड आदर्शगांव ता. पारोळा जि. जळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी सन 2014 पासून आज पर्यंत दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. यंदाच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 साठी एकूण 35 विद्यार्थी प्रविष्ट होते.
त्यात खालील प्रमाणे प्रथम पाच विद्यार्थी विशेष गुणांसहित उत्तीर्ण झालेले आहेत.
1. *रुचिता संदीप पाटील 89.00*
1. *आवेश कलीम पटेल 89.00*
2. *हर्षदा शिवाजी पाटील 88.80*
3. *प्रतीक्षा संदीप पाटील 88.00*
4.*प्रणव प्रवीण पाटील 87.80*
4.*केतन सुनील पाटील 87 80*
5.*करीम अमीन पटेल 87.60*
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे तसेच सर्व शिक्षकांचे संस्थाध्यक्ष तथा मा.आमदार दादासाहेब कृषिभूषण साहेबराव पाटील, संस्था उपाध्यक्षा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर नगरपरिषद, जिजामाता कृषिभूषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील, संस्थेचे सचिव बापूसाहेब लोटन देसले, तसेच राजवड , खेडीढोक व दगडी सबगव्हाण येथील सरपंच उपसरपंच व नागरिकांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.