यशवंत व्हा…! कीर्तीवंत व्हा…! मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलचा  दहावीचा 100 टक्के निकाल..

अमळनेरमाध्यमिक शिक्षण बोर्डाच्या  नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड.  संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. या विद्यालयाचा 100.00 % निकाल लागला  असुन इ. 10 वी च्या परीक्षेत  कु. लोहार नंदीनी महेंद्र (मारवड) हिने 94.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक*  तर  चौधरी घन:शाम चंद्रकांत (मारवड) 93.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर  कु. पाटील कामिनी दगडू (बोहरा) हिने 92.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो. जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य ,पर्यवेक्षक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन  केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साप्ताहिक अटकाव  परिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन..

[democracy id="1"]