प्रताप महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त केले प्रतिमा पूजन

अमळनेर: येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात काल पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ई १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य शाखेत प्रत्येक विभागात नुकतेच उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले क्रमशः प्रथम पाच अशा एकूण २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचे पालकांचा स्मृतिचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला. खानदेश शिक्षण मंडळचे मा. पदाधीकारी सर्व मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक, उपाध्यक्ष सौ माधुरी पाटील, कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, ज्येष्ठ संचालक ग.स. हायस्कूल चेअरमन हरी भिका वाणी, फार्मसी कॉलेजचे चेअरमन योगेश मुंदडे, समन्वय समिती प्रमूख नीरज अग्रवाल सर्व पदाधिकारी, संचालक, तसेच, मा प्राचार्य डॉ. ए. बी जैन, सह सचिव डॉ धीरज वैष्णव, उपप्राचार्य, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा आर. एम पारधी, मुख्याध्यापक प्रतिनिधी जी एस ठाकूर, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य, प्रा उल्हास मोरे, इतिहास विभाग प्रमुख , प्रा, डॉ धनंजय चौधरी , प्रा अमृत अग्रवाल, किमान कौशल्य तसेच कनिष्ठ, फार्मसी व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सचिन खंडारे, बाविस्कर, विद्यार्थी , विद्यार्थिनी इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे आणि प्राचार्य डॉ ए बी जैन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थीनीही प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा उल्हास मोरे यांनी केले, सूत्र संचलन प्रा दिनेश बोरसे यांनी व प्रा भानुदास गुलाले यांनी आभार मानले. काही प्राध्यापकांनी वैयक्तिक बक्षीस देवुन गुणवंतांना प्रेरणाही दिली.

[democracy id="1"]