मांडळ ग्रामस्थांचे पंचायत समितीचे बी डी ओ शिंदे यांना निवेदन

घाणीचे साम्राज्य दूर करण्याबाबत केली मागणी

अमळनेर:तालुक्यातील मांडळ येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे याना दि 24 रोजी निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की, गावातील न्यू प्लॉट भागात गटारी तुडुंब भरले आहेत,या गटरीचे पाणी,घरातील पाणी सह सांडपाणी गल्लीत व घरासमोर येत असल्याने प्लॉट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, याबाबत तेथील रहिवासी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना सांगितले असता संबंधित अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे तसेच ग्रामपंचायत कडे निधी उपलब्ध नाही, निधी उपलब्ध झाल्यावर गटारी साफ सफाई केली जातील असे उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे या परिसरात डास, दुर्गंधी,दलदल युक्त परिस्थिती निर्माण झाली आहे ,येणाऱ्या काळात पावसाळा सुरू होणार आहे,अगोदरच सांडपाणी व पावसाळ्यातील पाणी साचून आमच्या आरोग्याची मोठी हानी होऊ शकते,त्यामुळे आमच्या तक्रारीचा विचार करून आम्हला न्याय द्यावा अशी मागणी चे पत्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिंदे यांना ग्रामस्थांनी दिले आहे न्याय न मिळाल्यास कार्यालयासमोर उपोषण करण्याचे आवाहन दिले आहे या निवेदनावर शांताराम कोळी,सुरेश कोळी,विलास कोळी,सुनील कोळी,ईश्वर कोळी,सुभाष कोळी सह विविध लोकांच्या सह्या आहेत

[democracy id="1"]