पर्यटन विभागाने मंगळ ग्रह सेवा संस्थेला दिलेल्या पाच कोटींच्या विकास कामांचे शनिवारी भूमिपूजन..

स्वतःचे हेलिपॅड असलेले मंगळ ग्रह मंदिर ठरणार राज्यात एकमेव..

अमळनेर: येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाच्या पर्यटन विभागाने विविध विकास कामांसाठी चार कोटी ९९ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. सदर निधीतून करावयाच्या विविध विकासकामांचे तसेच संस्थेच्या खर्चाने होणाऱ्या हेलिपॅडचे भूमिपूजन जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते शनिवार ६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात होणार आहे.
दरम्यान या निमित्ताने स्वतःच्या मालकीचे हेलिपॅड असलेले श्री मंगळ ग्रह मंदिर राज्यातील एकमेव ठरणार आहे. देशातही स्वतःचे मालकीचे हेलिपॅड असलेली देवस्थाने अत्यंत नगण्य आहेत हे विशेष…! कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन संस्थेच्या सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.

[democracy id="1"]