भाजपा शिवसेना प्रणित शेतकरी पॅनलचा महामेळावा संपन्न

अमळनेर: ( योगेश पाने) दि. २६/०४/२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शहरातील अंबिका मंगल कार्यालयात भाजपा शिवसेना प्रणित शेतकरी पॅनलचा महामेळावा आज आयोजित केला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वर्गीय उदय वाघ यांची सभापती पदाची कारकीर्द तालुक्याने अनुभवलेली होती यंदाही भाजपा शिवसेना प्रणित शेतकरी पॅनल ने या निवडणुकीसाठी योग्य उमेदवार दिले आहे. सदर मेळाव्यास खासदार उन्मेष पाटील यांनी संबोधित करत असताना सांगितले की जोपर्यंत सज्जन उमेदवारांच्या मागे आपण उभे राहत नाही तोपर्यंत चांगले चित्र या निवडणुकीत निर्माण होणार नाही. सुदैवाने मार्केटच्या निमित्ताने या निवडणुकीत माजी आमदार स्मिताताई वाघ माजी आमदार शिरीष दादा चौधरी माजी आमदार डॉक्टर बी. एस. पाटील हे एकत्रित झाले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे हित साधले जाणार आहे यामुळे शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा. अंबिका मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात माजी आमदार बी एस पाटील माजी आमदार शिरीष दादा चौधरी या सह शेतकरी पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांसमोर शेतकरी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्यास तालुक्यातील असंख्य मतदार बंधू उपस्थित होते. व्यासपीठावर एडवोकेट व्ही.आर पाटील, बाळासाहेब पाटील, शाम अहिरे, भैरवीताई वाघ, महेश पाटील, संदीप पाटील, योगेश मुंदडा, ओमप्रकाश मुंदडा, गोविंद मुंदडा, यावेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात शेतकरी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन भाजपा शिवसेना यांनी मतदारांना यावेळी केले.

[democracy id="1"]