सरस्वती विद्या मंदिर शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

अमळनेर: येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, सहशालेय उपक्रम व स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.
श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर तर्फे गुणवंत विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर, रंगभरण,लेझिम, गितगायन, समुह गीत गायन, नियमित उपस्थित विद्यार्थी, चित्रकला, रांगोळी स्पर्धा,स्वातंत्र्य दिवस उप्रकम आदींचे सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावर्षी आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमात ११२ विद्यार्थ्यांनी बक्षिसे व प्रमाणपत्र मिळविलीत.
पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी करतांना सांगितले की,’शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या गुणात्मक व कलात्मक विकासासाठी कला-क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांसह सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात येते’ “वर्षभर राबविलेल्या उपक्रम व स्पर्धांमधील यशासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद आहे” अश्या शुभेच्छा सदर समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिल्यात.
याप्रसंगी श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष समाधान शेलार,संचालक समाधान पाटील आदिंसह शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे,जेष्ठ शिक्षक आनंदा पाटील,शिक्षिका सौ.संगीता पाटील, सौ.गीतांजली पाटील आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत विविध बक्षिसं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर,धर्मा धमगर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पूनम पाटील,शितल पाटील व पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[democracy id="1"]