उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी आयुर्वेदातील खास टिप्स

सध्या सगळीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे. या उन्हामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आयुर्वेदातील काही खास टिप्स.

अमळनेर : राज्यातील सर्वच शहरांमधील तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे. बाहेर उन्हाचा चांगलाच चटका लागत आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे शरीरावर सुद्धा अनेक परिणाम होत असतात. ताप, उन्हाळी लागणे, उलट्या असे अनेक आजार उन्हात फिरल्याने उद्भवू शकतात. शाळांनाही आता सुट्ट्या लागल्याने मुलं दिवसभर उन्हात खेळत असतात. या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, आणि हा उन्हाचा कडाका सुसह्य करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य विनायक खडीवाले यांच्या खास टिप्स

१. योग्य आहार घ्याआयुर्वेदात हा ऋतु हिन बल सांगणारा आहे. तुमचं बल हिरावून घेणारा असा हा उन्हाळा ऋतू असल्याने तुम्ही योग्य आहार घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात शक्यतो पचायला हलका आहार घ्यावा. ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण याचा आहारात समावेश करावा. तसंच तुम्ही एखादं सुप किंवा मुगाचं सुपही घेऊ शकता.

२ तीन ते चार लिटर दिवसाला पाणी प्याउन्हाळ्यात खूप डिहायड्रेशन होत असतं. शरीरातील पाणी कमी होत असतं. त्यामुळे उन्हाळ्यात रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. असे केल्यास तुम्ही डिहायड्रेशन, चक्कर येणे यापासून स्वत:चे संरक्षण करु शकता.

३. सरबतं घ्यागुलकंद बी, तुळशीच्या बी चं पाणी, ताजं ताक यांचं सेवन तुम्ही उन्हाळ्यात करा. तसेच चंदनाचं सरबत, वाळ््याचं सरबत घेतल्याने तुम्हाला शक्ती मिळेल. चहा, कॉफी शक्यतो टाळावे.

४. हे पदार्थ टाळाखव्याचे, तसेच बासुंदीचे पदार्थ उन्हाळ््यात शक्यतो टाळावेत. ताका व्यतिरिक्त दुसºया दुधाच्या पदार्थांचे सेवन करु नये. आंबवलेले पदार्थ, शेव, बिस्कीटं, भजी या गोष्टी उन्हाळ््यात बंद करायला हव्यात.

५. सुप घ्याउन्हाळ्यात तुम्ही विविध प्रकारचे सुप घेऊ शकता, फळभाज्या, पालेभाज्यांच सुप तुम्ही घेतलं तर ते तुमच्या शरीरासाठी योग्य असेल.

६. जास्तीत जास्त फळं खाअंजीर, काळे मनुका, कलिंगड, काकडी, टरबूज अशी फळं तुम्ही उन्हाळ्यात खाऊ शकता. जेवणात आंब्याचा समावेश सुद्धा करु शकता. तास दोन तास आंबा पाण्यात भिजवून ठेवून त्यानंतर आंब्यामध्ये एक दोन चमचे तुप व किंचित मिरपुड घालून आंबा खाण्याचा तुम्हाला उन्हाळ्यात खूप फायदा होईल. आंब्यामध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात. मात्र आंब्यावर पाणी पिऊ नये.

[democracy id="1"]