मारवड महाविद्यालयात ” नवीन शैक्षणिक धोरण व नॅक यावर कार्यशाळा ” संपन्न

अमळनेर:मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात (अंतर्गत गुणवत्ता सुधार समिती) आय. क्यू. सी. विभागाद्वारे पारोळा येथील किसान महाविद्यालयातील नॅक समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ” नवीन शैक्षणिक धोरण व नॅक यावर कार्यशाळा ” संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आय. क्यू. सी. विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. पवन पाटील यांनी नॅक प्रक्रियेबाबतीत उपस्थितांना माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना, नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयाला नॅक चे महत्व व कार्यवाही विषद करून, नॅक मधील 7 कॅटेरियांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाने नॅकला सामोरे जातांना घ्यावयाची दक्षता, प्रत्यक्ष नॅक समितीच्या भेटी प्रसंगी चे कामकाज याबद्दल माहिती दिली. तसेच व्याख्यानानंतर उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी महाविद्यालयाच्या विकासात नॅकची भुमिका स्पष्ट करून, नॅक प्रक्रियेला घाबरून न जाता आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले

महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी कार्यशाळेचे आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी यांनी सहकार्य केले.

[democracy id="1"]