गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व गोळ्या औषध वाटप

सुकेश्वर बहुउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

अमळनेर: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास आजपासून (30 मार्च) सुरुवात होत आहे,30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या चैत्रोत्सवात दूरवरून भावीक सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविकांना पायी प्रवासामुळे आरोग्य बिघडते म्हणून पायी जाणाऱ्या भाविकासाठी सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिषद संस्था अमळनेर मार्फत श्री संजय भाऊ महाजन व हेमराज महाजन यांचे कडून मोफत आरोग्य तपासणी व गोळ्या औषध वाटप दि ३०/०३/२०२३ पासून एच.पी.गॅस गोडावून धुळे रोड अंमळनेर येथे सुरु करण्यात आले आहे. या संस्थेमार्फत भाविकांसाठी वैद्यकीय सेवा आणि मोफत औषधोपचार दिले जात आहेत तरी भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिषद संस्था अमळनेर मार्फत श्री संजय भाऊ महाजन व हेमराज महाजन यांचे कडून करण्यात येत आहे यावेळी सुनील भाऊ शिंपी व मित्र मंडळ उपस्थित होते तसेंच मेडिकल औषधी व गोळ्या वाटप साठी फार्मासिस्ट, आशिष महाजन, विशाल महाजन,प्रफुल महाजन, हर्षल महाजन ज्ञानेश्वर महाजन मनीष महाजन निलेश महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

[democracy id="1"]