मारवडच्या ग्राम विकास शिक्षण मंडळाकडून प्राचार्य डॉ. वसंत देसले यांचा सत्कार

°°°°°°°°°°°°°°°°बातमी १)°°°°°°°°°°°°°°°°

१)अमळनेर: मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांची नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या “इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य” म्हणून निवड झाल्याबद्दल, ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड तर्फे प्राचार्य डॉ. वसंत देसले सरांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव मा. आबाजी देविदास बारकू पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेच्या मारवड, करणखेडे व डांगरी येथील शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एल. जे. चौधरी यांनी केले. यावेळी संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील यांच्या हस्ते प्राचार्य डॉ वसंत देसले सरांचा शाॅल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर उपस्थित सर्व संचालक मंडळ व मान्यवरांनी प्राचार्य डॉ वसंत देसले सरांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य डॉ वसंत देसले सरांनी, ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ स्तरावर सतत कार्य करीत राहण्याचा मनोदय व्यक्त केला. तर अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील यांनी, कुलगुरू साहेबांनी मारवड सारख्या खेडे गावातील महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून, महाविद्यालयाला विद्यापीठ स्तरावर अभ्यास मंडळावर कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करून धन्यवाद दिले. तसेच महाविद्यालयाने या संधीचे सोने करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री. पी. बी.सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाळांचे शिक्षक, प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले..______________________________________________________________________________________________

°°°°°°°°°°°°°°°°बातमी 2)°°°°°°°°°°°°°°°°

२) मारवड महाविद्यालयात इतिहास आणि राज्यशास्त्र विभागाची संशोधन कार्यशाळा संपन्न

अमळनेर: कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड, येथे शनिवार दिनांक 25 मार्च रोजी “इतिहास आणि राज्यशास्त्र” या विभागाकडून संशोधन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. तर विद्यार्थ्यांना संशोधनाविषयी व्याख्यान देण्याकरिता प्रमुख अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील इतिहास विभागाचे प्रा. डॉ. धनंजय चौधरी उपस्थित हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. यामध्ये त्यांनी इतिहास संशोधन ही प्रगतशील आणि प्रभावी होण्याची गरज आहे, असे मत माडले तद्नंतर प्रमुख अतिथी डॉ. धनंजय चौधरी यांनी प्रस्तुत संशोधनाची संशोधन पद्धती यावर प्रकाश टाकला. यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी संशोधनाची उद्दिष्टे ,गृहीतके, सामाजिक उपयोगिता, आणि आज घडीला इतिहासावर संशोधन होणे खूप गरजेचे आहे अशी मांडणी केली, या कार्यशाळेचे आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाला इतिहास आणि राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

[democracy id="1"]