आम आदमी पार्टीचा जुनी पेन्शन आंदोलनास सक्रिय पाठिंबा!

प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांना भेटून झाले ‘आप’चे लोक सहभागी!

अमळनेर:कर्मचारीना निवृत्तीनंतर आधार असलेली पेन्शन नाकारणाऱ्या व सट्टाबाजारात कष्टाची रक्कम लावणाऱ्या शासनाचा निषेध करीत जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून अमळनेर आम आदमी पार्टीने सक्रिय पाठिंबा देत आंदोलकांचे मनोबल वाढविले.
आम आदमी पार्टीने जुनी पेन्शन बाबत दिल्ली व पंजाब येथे सकारात्मक भूमिका घेतली असून महाराष्ट्र सरकारने खोक्या पलीकडे जाऊन ठोक निर्णय घेतला पाहिजे अशी मागणी तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी व जुनी पेन्शन बाबत आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांना पाठींबा देण्यासाठी आप चे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी जाऊन सहभागी झाले,
तालुकाध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपप्रमुख प्रा. गणेश पवार, नाना अभिमान पाटील, स्वप्नील पाटील, लियाकत वायरमन, राजेंद्र पाटील, रामकृष्ण देवरे, शिवाजी पाटील, मनीषा नारायण पाटील, सचिन पाटील, महेंद्र साळुंखे, मोतीलाल महाजन, जितेंद्र पाटील, यांचा सहभाग होता.

[democracy id="1"]