तालुक्यातील सर्व लाभार्थी रेशन कार्डधारकाना म.तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडून आवाहन

मोबाईल क्रमांक रेशनकार्ड प्रणालीमध्ये नोंदवुन आधारक्रमांकाशी संलग्न करणेबाबत.

अमळनेर: ????मोबाईल क्रमांक रेशनकार्ड प्रणालीमध्ये नोंदविणेबाबत सर्व कार्डधारक यांना सुचित करण्यात येतेकी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनकार्ड
व्यवस्थापन प्रणाली ( RCMS) मध्ये लाभार्थी मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीमसुरूकरण्यात
आली आहे. अमळनेर तालुक्यातील (AAY+PHH) कार्डधारक लाभार्थी यांनी आपल्या कार्डमधील
सदस्यांचे मोबाईल क्रमांक माहे मार्च २०२३ चे धान्य रेशनदुकानातून घेतांना रेशनदुकानदार यांचेकडे
पॉस मशीनवर किंवा तालुका पुरवठा कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर यांचेकडे नोंदणी
करावी. कार्डधारक यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांकाची नोंदणीकेल्यास कार्डधारक
यांना धान्य प्राप्त झाल्याची माहिती मोबाईल वर उपलब्ध होणार आहे. ज्या कार्डधारकांनी या पूर्वी
मोबाईल नोंदणीकेली आहे व तोक्रमांक चुकीचा असेलतर अशा कार्डधारकांनी तालुका पुरवठा
कार्यालयात संपर्क साधून पुन्हा नव्याने सुधारित मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे.
???? मोबाईल क्रमांक आधारक्रमांकाशी संलग्न करणेबाबत
तालुक्यातील ज्या कार्डधारक यांचे वृध्दापकाळाने / वयोमानानुसार शारिरीक व्यंग इ कारणाने
रेशनदुकानदार यांचेडील पॉस मशीनला बायोमेट्रीक व्यवहार होण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत
आहे व ज्यामुळे सदरचे कार्डधारक धान्य घेण्यापासून वंचित राहत आहेत अशा कार्डधारकांना सूचित
आधार
करण्यात येते की, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार केंद्रावर जाउन मोबाइल क्रमांकाशी लिंक
करून घ्यावा ज्यानंतर सदर कार्डधारक यांना पॉस मशीन वर असलेल्या ओटीपी (OTP) सुविधेव्दारा
धान्य प्राप्त करूण घेणे सुलभ होणार आहे.
तालुक्यातील सर्व लाभार्थी कार्डधारक यांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी
लवकरात लवकर आपले कुटूंबातील सदस्यांचे मोबाइल क्रमांक ऑनलाईन नोंदणी करावी तसेच
आपले आधार क्रमांका सोबत मोबाईल क्रमांकलिंक करून घ्यावा.असे म.तहसीलदार सो.अमळनेर यांनी माहिती पत्रकाद्वारे कळविले आहे.

[democracy id="1"]