परंतु मानधनवाढीबाबत नाराजी कायम
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
कर्मचाऱ्यांच्या १५००/- रुपये केलेल्या मानधनवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत समाधानकारक वाढ जाहीर करावी या मागणीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.९ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी आपल्या संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात आला. शासनाने अर्थसंकल्पात संभ्रम निर्माण करणारी मानधन वाढीची घोषणा केली त्याच्या आपण सर्व जणी साक्षीदार आहेत. मोर्चाच्या परिणामी आज दि.१० मार्च २०२३ रोजी महिला व बालविकास विभागाचे उपसचिव, मा. श्री. विलास ठाकूर यांच्याशी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांच्यासह कार्याध्यक्ष श्री. युवराज बैसाणे, श्री. रामकृष्ण पाटील आणि श्री. सुधीर परमेश्वर यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार वाढ करत १० वर्षे सेवा झालेल्या अंगणवाडी सेविका - १०,०००/- रुपये,११ वर्षे ते २० वर्षे सेवा - १०,३००/-, २१ वर्षे ते ३० वर्षे सेवा १०,४००/- आणि ३० वर्षापुढील सेवा- १०,५००/- रुपये मानधन वाढ,मिनी अंगणवाडी सेविका १० वर्षे सेवा ७२००/-, ११ ते २० वर्षे सेवा -७४१६,२१ वर्षे ते ३० वर्षे सेवा -७४८८/- रुपये, ३० वर्षापुढील सेवा -७५६० रुपये मानधन वाढ मदतनीस १० वर्षे सेवा ५५००/-, ११ वर्षे ते २० वर्षे सेवा -५६६५/-, २१ वर्षे ते ३० वर्षे सेवा ५७२०/- ३० वर्षापुढील सेवा - ५७७५/- रुपये अशी मानधनवाढ करण्यात आली असल्याचे श्री. ठाकूर साहेब यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा *पेन्शन योजना* लागू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून संघटनेशी चर्चा केल्या नंतर त्यावर निर्णय केला जाईल अशी माहिती देण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना *आजारपणाची रजा* देण्यात यावी या आपल्या मागणीवर शासन विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. मदतनीसांना *थेट नियुक्तीसाठी शिक्षणाची अट शिथिल करण्याबाबत* विचारविनिमय सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे वाढवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या *एकरकमी लाभच्या रकमांची* सर्व प्रकरणे माहे मे महिन्यापर्यंत निकालात काढली जातील असे सांगण्यात आलेे. या वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या *गणवेशाच्या रकमेत वाढ* करत ८००/- रूपयांऐवजी १०००/- रूपये करण्यात आली आहे. नागरी भागातील अंगणवाडी केंद्राच्या *घरभड्याच्या रकमेत* वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.*सादील खर्चाच्या* रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले. कोरोना काळातील केलेल्या कामाचा *प्रोत्साहन भत्ता* देण्याबाबत ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगण्यात आले. अंगणवाडी सेविकांना *मुख्यसेविकेच्या भरतीसाठी* असलेल्या अटी शिथिल करण्याबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगण्यात आले. कोरोना काळातील शिल्लक असलेली *उन्हाळी सुट्टी* देण्याबाबत मा. आयुक्त एबाविसेयो नवी मुंबई यांना कळविले जाईल. असेही चर्चेत सांगितले गेले.*अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन काळातील मानधन कपात करू नये अशी शिष्टमंडळाने आग्रही मागणी केली* त्यावर याबाबत मा. आयुक्त कार्यालयाला कळविण्यात येईल असेही चर्चेत सांगण्यात आले. या व अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत कक्ष अधिकारी श्री. जाधव,अवर सचिव. जहांगीर खान यांचाही सहभाग होता. चर्चा समाधानकारक झाली असली तरी *मानधन वाढीबाबत शिष्टमंडळाने चर्चेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.* अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हार न मानता यापुढे जिद्दीने आंदोलनात उतरावे असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केले आहे.