मारवड महाविद्यालयात ” आंतरराष्ट्रीय महिला दिन ” साजरा

मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 8 मार्च रोजी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेविका कु. नाजमीन पठाण हीने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना महीला दिनाचे महत्व सांगून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले तर प्रमुख वक्त्या म्हणून समाजशास्त्र विभागप्रमुख व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य लिपिक श्रीमती मंजुषा गरुड, प्रा. डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ. जितेंद्र माळी हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो स्वयंसेविका कु. वैष्णवी महाजन हीने, आधुनिक काळातील समाजात महिलांचे स्थान व त्यांच्या पुढील आव्हाने यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महीला दिनाचा इतिहास सांगून, जगातील विविध राष्ट्रांमधील महीलांनी उभारलेल्या चळवळी, आंदोलने व उस्फुर्तपणे विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भारतातील प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या महीलांनी राजकारण, समाजकारण व विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेविका कु. कोमल पाटील हीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने बहुमोल सहकार्य केले.

[democracy id="1"]