अतिक्रमण करणाऱ्या शेवगे बु. येथील ग्रामपंचायत सदस्या योजनाबाई पाटील यांना अपात्र करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पारोळा : तालुक्यातील शेवगे बु. ग्रामपंचायत सदस्या योजनाबाई हरिश्चंद्र पाटील यांनी गावातील गावठाण जागेवर अवैध अतिक्रमण करून घेतले आहे. म्हणून त्यांना अपात्र करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालूक्यातील शेवगे बु. ग्रामपंचायतीकडे गावठाण जागा आहे. अनेक लाभार्थांचे घरकुल देखील मंजूर झाले आहेत. मात्र ग्रामपंचायत सदस्या योजनाबाई हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांचे पाटील हरिश्चंद्र वना पाटील यांनी अवैध अतिक्रमण करून घेतले असल्याने तेथील घरकुल लाभार्थांना घरकुल बांधता येत नाहीयेत. आम्ही सदस्य आहोत आमचं कुणीच काही करू शकत नाही असा समज त्यांना असून ते यानुसार गावातील लोकांना घाबरवत देखील असतात. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक देखील या लोकांना घाबरून अतिक्रमण काढण्यास सांगत नाहीत. पदाचा गैरवापर करत हजारो स्क्वेअर फुट जागेवर सदस्या योजनाबाई व त्यांचे पती हरिश्चंद्र पाटील यांनी अतिक्रमण केले आहे. तर आता पुन्हा काही जागा हडप करीत त्या जागेवर शेततळ्याचे बांधकाम सुरु आहे. एकीकडे शेवगे बु. गावातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नाही तर दुसरी कडे मात्र सदस्यांनी एवढ्या मोठ्या जागेवर अतिक्रमण केले आहे. म्हणून पदाचा गैरवापर करीत अतिक्रमण करणाऱ्या शेवगे बु. येथील ग्रामपंचायत सदस्या योजनाबाई हरिश्चंद्र पाटील यांना अपात्र करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान मैराळे यांनी केली आहे..