बडगुजर समाज मंगल कार्यालय येथे मोफत महाआरोग्य शिबीरास भरगच्च प्रतीसाद

कै. पुंडलिक सुकलाल शेठ बडगुजर यांचे स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर

अमळनेर: येथे दिनांक १ मार्च२०२३ बुधवारी तपासणी वेळ ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत कै. पुंडलिक सुकलाल शेठ बडगुजर यांचे स्मृतिदिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन जळगाव तर्फे भव्य आयोजित महाआरोग्य मोफत सर्व आजारांवर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबीरात मुत्रविकार,नेत्र विकार,नाक कान घसा,स्री रोग तज्ञ,अस्थी रोग तज्ञ,शल्य चिकित्सक, जनरल मेडिसिन इ. प्रकारचे डॉक्टर उपस्थित होते.त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन जनतेचा
महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . शिबीरात सहभागी होणे साठी जनतेने सकाळ पासून १० वाजेपर्यंत त्रिशतक पारकरूनही भरपुर गर्दी ओसंडत शिबीर सुरु झाल्यावर देखील लोक लाभ मिळावा म्हणून लाईनित नोंदणी करिता सज्ज होते. सुमारे ५०० लोकांना तपासणी करण्यात आली.त्यापैकी सुमारे ४९ ते५०जणांना पुढील तपासणी व आप्रेशनासाठी जळगाव येथे दिनांक ३ मार्चला गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील महाविद्यालय येथे बोलविले आहे. सदर शिबीराचे आयोजक श्री सदानंद पुंडलिकशेठ बडगुजर. व श्री प्रवीण पुंडलिकशेठ बडगुजर (लक्ष्मी स्पलायर्स) होते तर संयोजक क्षत्रिय बडगुजर समाज पंच मंडळ अमळनेर कार्यकारणी सदस्य यांनी सहभाग नोंदविला . तसेच
श्री घन:शाम मांडळकर, दिनेश मांडळकर, कैलास महादूशेठ बडगुजर ,जगन्नाथशेठ बडगुजर, शुभम खेमचंद बडगुजर, प्रभुदास शेठ बडगुजर, गिरीष प्रभुदास शेठ बडगुजर ,उज्वल दिलीपशेठ बडगुजर, विशाल प्रवीण बडगुजर व लक्ष्मी स्पलायर्स स्टाफ आणि समाज बांधव यांचे सहकार्याने कार्यक्रम अत्यंत भरभरून अती उत्साहात संपन्न झाला.

[democracy id="1"]